mahad talai landslide

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



महाड तालुक्यातील तळई गावामध्ये काल रात्री दरड कोसळली होती. आज सकाळी येथे एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने  बचावकार्याला सुरुवात झाली. आतापर्यंत मातीच्या ढिगार्‍याखालून 32 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 30 ते 40 जण याठिकाणी अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे बचावपथक दाखल झाले असून बचाव आणि शोधमोहिम मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांकडून आणि प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.



गेल्या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चक्क 10 ते 15 फूट रस्त्यांवर आणि वस्त्यांत पाणी शिरल्याचं पहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीला ढगफूटी सदृश्य अतीमुसळधार पावसाने, महापूर परीस्थिती निर्माण केलीय. सावित्री नदीला आलेल्या महापूरामुळे महाड शहर पुर्णपणे पाण्याखाली गेलं आहे.



याच पार्श्वभूमीवर आज पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. तर,पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूमकडून देण्यात आली आहे.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.