mahad talai landslide

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गेले काही तास भयंकर मुसळधार पाऊस पडून संपूर्ण महाड शहर पाण्याखाली गेले होते. त्यातच संध्याकाळच्या सुमारास बातमी आली कि, तळीये गावात दरड कोसळून अनेकजण गाडले गेल्याची भीती भीती व्यक्त करण्यात आली.



आज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ३६ जणांचा यात मृत्यू झाला आहे, ७२ जण गाडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूरसदृश्यस्तिथी आणि मुसळधार पाऊस यामुळे या गावात ४००-५०० जण अडकून असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



वीज तसेच मोबाईलला कोणतेही नेटवर्क नसल्यामुळे गावातील माहिती उशिरापर्यंत मिळू शकली नाही. NDRF व इतर स्थानिक प्रशासन महाड शहरातील परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात होते. परिणामी कोणतीही शासकीय यंत्रणा वेळेवर गावात पोहोचू शकली नाही.
तळीये गाव हा दुर्गम डोंगराळ भागात असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते मात्र काही वेळापूर्वी NDRF टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे.
– आदिती तटकरे (पालकमंत्री, रायगड)

तळीये गावात जाणाऱ्या रस्त्यांवरती ९ फुटांपर्यंत पाणी असल्यामुळे ते कमी झाल्यावर बोटीतून जाता येण्याचा प्रयत्न करू असे NDRF पथकातर्फे सांगितले होते.



शासनाची मदत पोहोचली नसल्याचा प्रवीण दरेकर यांचा आरोप:


विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर कालपासून महाड भागातील पूरसदृश्य ठिकाणांची पहाणी करत होते, आणि आज तेसुद्धा तळीये गावात पोहोचले असून त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी ४:०० वाजता हि दुर्घटना घडली तेव्हा स्थानिकांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली. परंतु प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी वेळेवर पोहोचला नाही.



आम्ही मुंबईहून तळीये गावात पोहोचू शकतो तर मग प्रशासन झोपले आहे का

– प्रवीण दरेकर

दरड का कोसळली गेली?



तळीये गावात एक मोठा धबधबा असून उत्खननासाठी त्या धबधब्याशेजारची जमीन व मातीचा उपसा करण्यात आला होता. त्यामुळे दरड कोसळली गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या दुर्घटनेबाबत सखोल चौकशीची मागणी केली जात आहेत.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us

By raigad

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.