आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



माजी आमदार माणिकराव जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.  रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम माणिकराव जगताप यांनी केलं.



महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. कोविडची लागण झाल्याने  त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. अंत्यसंस्कार महाड येथे आज दुपारी 2 वाजता होणार आहेत. त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी कॅप्टन जगताप बंगला,नवेनगर, महाड येथे ठेवण्यात येणार आहे.



विद्यार्थी काँग्रेसमधून माणिकराव जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.



रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम माणिकराव जगताप यांनी केले. त्यांच्यामागे पत्नी , मुलगा , मुलगी, भाऊ , नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाडकर महापुरातून सावरत नाहीत तर त्यांच्या जाण्याने महाडवासियांना आणखी एक धक्का मिळाला आहे..


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.