sankalp group indapur helps mahad flood

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



महाडमध्ये अनेक सामाजिक संस्था तसेच इतर शहरांतील नागरिकांनी मदतीचा ओघ चालूच ठेवला आहे. असेच संकल्प ग्रुप इंदापूर ग्रुप तर्फे तरुणवर्गाने तसेच सन्मित्र मंडळ लोणेरे व ग्रामस्थ लोणेरे मित्रपरिवार यांजकडून महाड शहर व गावातील 200 पेक्षा अधिक पूरग्रस्त कुटुंबियांना एक हात मदतीचा म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा वाटप करून हातभार लावला आहे.



समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा हा विचार जोपासत आज महाड पूरग्रस्त विभागामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले गेले. महाड शहरालगत असणारे सभोवतालची अनेक खेडेगाव पूर ओसरल्यापासून सर्व जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित होता किंवा तुटपुंजी मदत त्यांना मिळत होती. अशा ठिकाणी आज संकल्प ग्रुपतर्फे संपूर्ण दिवसभर मदत करण्यात आली.



कोल हे गाव सावित्री नदीपासून खूप अंतरावरती असूनदेखील संपूर्ण घरे पाण्याखाली गेली होती. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार नदीलगतची संपूर्ण गावे व भातशेती पाण्याखाली पाण्याखाली होती जणू आमच्या भागाला समुद्राचे स्वरूप आले होते. आता पाणी ओसरले असले तरी जीवनावश्यक वस्तूंची कमतरता तसेच वीज आणि पिण्याच्या पाण्याची समस्या असून संकल्प ग्रुपतर्फे केलेल्या मदतीसाठी उपस्थित गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आभार व्यक्त केले.



संकल्प ग्रुप इंदापूरमध्ये सर्व सुशिक्षित तरुण-तरुणी गेली १३ वर्षे सामाजिक उपक्रम राबवून विशेषतः खेड्या-पाड्यांमध्ये मदत आणि इतर जागृकता मोहीम राबवत आले आहेत. सद्यपरिस्थितीत महाड शहरालगत गावांमध्ये मदत अपुरी आहे हे समजताच रात्रभर पॅकिंग करून दिवसभर माणुसकी या नात्याने ग्रुपतर्फे मदत करण्यात आली.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.