nanasaheb-dharmadhikari-pratishthan

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



कोकणातील महाड,पोलादपुरसह खेड, चिपळून येथील पुरग्रस्तांच्या मदतीला डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या हजारो श्रीसदस्यांचे हात सरसावले आहेत. सुमारे दिड हजारपेक्षा जास्त सदस्य शहरे स्वच्छ करण्याच्या कामात गुंतली आहेत.



या सर्व वस्तु उचलण्यापासून ते रस्त्यावरती साचलेला गाळ यांची विल्हेवाट लावण्यासाठी पुरग्रस्थ भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री. डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्थ सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.



हे स्वच्छता अभियानासाठी आज सकाळपासून प्रतिष्ठानचे सदस्य काम करत आहेत. तसेच शहरातील शासकीय कार्यालये देखील पुराग्रस्थ झाल्याने त्यांमधील गाळ व दस्तऐवज काढण्याकामी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र आले आहेत.



सदर स्वच्छता अभियानाच्यावेळी स्वत:चा जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल तसेच सॅनिटायझर, माक्स याचा योग्य वापर करत स्वच्छतेचे काम सुरू आहे. सदर अभियानासाठी महाड नगर परिषद, पोलादपूर व चिपळूण प्रशासनाने सहकार्य केले आहे. हे नियोजन स्वच्छता पूर्ण होई पर्यंत राहील.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.