आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



पोलादपूर – संदिप जाबडे: २२ जुलै रोजी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, क्षणात होत्याचे नव्हते झाले. महापूर आल्याने महापुरात घरातील दैनंदिन वापरातील वस्तू वाहून गेल्या. दरड कोसळण्याने ८०-९० निष्पाप जीवांना आपल्या जीवाला मुकावे लागले तर कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.



स्थलांतर केले तरी अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींची गरज पडणारच! याच गोष्टीची जाणीव ठेऊन सामाजिक बांधिलकी जपत पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे मार्फत नानेघोल, साखर आदिवासीवाडी, साखर चव्हाणवाडी, साखर सुतारवाडी, गोवेले साळवीकोंड, पोलादपूर शहर, चरई भोईवाडी, साळवीवाडी, सवाद, माटवण, बिरवाडी, महाड शहर इत्यादी ठिकाणी आपत्तीग्रस्तांना ५०० जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले. ४० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी व गरजवंतांच्या मदतीसाठी नेहमी धावणारी पोलादपूर तालुका रहिवासी संघ, पुणे ही संघटना पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीसाठी धावून आली.



महाड व पोलादपूर करांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यात आम्ही सुद्धा सहभागी आहोत’. त्यांचे अश्रू आम्ही कमी करू शकत नाही तरीसुद्धा एक छोटीशी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे असे उदगार संघाचे अध्यक्ष किसनराव भोसले यांनी याप्रसंगी बोलताना काढले



सदरील वाटप कार्याला संस्थेचे अध्यक्ष किसनराव भोसले, कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल कदम, सचिव राजेंद्र मोरे, सहसचिव सचिन पार्टे, खजिनदार ज्ञानेश्वर साळुंखे, खजिनदार ज्ञानेश्वर साळुंखे, सहखजिनदार ज्ञानेश्वर खरोसे, कार्यकारिणी प्रतिनिधी राजू कदम, कायदेशीर सल्लागार पी टी जगदाळे, शंकर खरोसे, लहू उतेकर, सिताराम भडाले, अनिल मोरे, अनंत जाधव, समीर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.