आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे सर्वत्र जमलेला कचरा, चिखल, गाळ तात्काळ साफ करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड शहराच्या दौऱ्यात स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटींचा निधी जाहीर.



ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून महाड शहराच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. महाड शहराच्या स्वच्छतेसाठी यापूर्वीच 50 लाखांची मदत जाहीर केली होती, मात्र झालेलं नुकसान पाहता ती पुरेशी नसल्याचं निदर्शनास आल्याने वाढीव दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय आज महाड दौऱ्यादरम्यान मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.



कोकणात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महाड, चिपळूण, खेड या शहरांना बसला. महाड शहरात आणि बाजारपेठेत तब्बल १३ फुटापर्यंत पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब होती ते शहर स्वच्छ करण्याची, महाड नगरपरिषदेची क्षमता मर्यादित असल्याने या कामासाठी स्वतः एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.



ठाणे महानगरपालिकेचे १५० सफाई कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे १२० सफाई कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे १०० सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे ३० जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता मोहिमेसाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महानगरपालिकेने पाठवलेली ड्रेनेज लाईन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, ५ घंटागाड्या, ठाणे महानगरपालिकेची काही जेटिंग मशिन्स, ठाणे मनपाचे ३ फायर ब्रिगेड टँकर्स, ३ महाड नगरपरिषदेचे फायर टॅंकर्स तसेच ठाणे आणि खोपोली वरून घरे स्वच्छ करण्यासाठी आणण्यात आलेले स्प्रेइंग मशिन्स, रोगराई पसरू नये यासाठी मारण्यात येणारी फोगिंग मशिन्स अशा सामुग्रीचा समावेश आहे.

संपूर्ण महाड शहराची ४ विभागात विभागणी करून घरोघरी कर्मचारी पाठवून या साफसफाईच्या मोहिमेस सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपुल्ले, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड शहराचे मुख्याधिकारी जीवन पाटील तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.