aditi tatkare launched maza udyog


मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत ( CMEGP ) माझा व्यवसाय, माझा हक्क ही योजना रायगड मतदारसंघात राबविण्यात येत आहे. रोहे येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून या योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते टेम्पोची चावी देऊन गाड्यांचे वितरण करण्यात आले.



मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत ( CMEGP ) माझा व्यवसाय, माझा हक्क या योजनेचा मुख्य उद्देश रायगड मतदार संघातील युवकांसाठी आणि सर्व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सहकार्य मिळावे हा आहे.



या योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आवाहन केले.



यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, संतोष पवार, विकास धारीवल, इमरान खान तसेच तहसीलदार, नगराध्यक्ष, पोलिस अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.