shivsena meeting raigad


जिल्ह्यात कुठल्याही पक्षासोबत आघाडी करायला सांगा; पण राष्ट्रवादीसोबत जमणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेसह आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणूका स्वबळावरच लढवून भगवा फडकवू, असा विश्वास त्यांनी दिला आहे.



माजी खासदार अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथे राष्ट्रवादीवर केलेल्या घणाघाती टिकेचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले आहेत. गीते यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी तर ततरलीच; परंतू शिवसेना नेत्यांनाही स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी रायगडात यावे लागले.शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (21 सप्टेंबर) माणगाव येथे तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी सेनेचे आजी-माजी आमदार तसेच पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. देसाई यांनी आगामी स्थानिक निवडणूकांबाबत पदाधिकार्यांची मते जाणून घेतली.



राज्यात महाआघाडी असली तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत जाण्यास स्थानिक पदाधिकार्यांनी विरोध दर्शवला आहे. वेळ पडलीच आणि युती आघाडी करायची वेळ आली तर अन्य कुठल्याही पक्षासोबत युती करायला सांगा; पण राष्ट्रवादी नकोच, अशी स्पष्ट भूमिका या बैठकीत मांडली असल्याचे समजते.



रायगडात आमदार जास्त असतानाही पालकमंत्रीपद मात्र एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला मिळाले, याचे शल्य आमदारांसह शिवसैनिकांना आहे. त्यात पालकमंत्री आणि खासदार कुरघोडीचे राजकारण करतात, आमदारांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी शिवसेनेकडून केल्या जात आहेत.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.