tata and air india


सरकारी कंपनी एअर इंडियाची खरेदी टाटा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पॅनलने एअर इंडियासाठी टाटा समूहाची निवड केली आहे.



नागरी उड्डाण मंत्रालय, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी टाटा समूहाचे प्रतिनिधी आणि स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांची भेट घेतली.



ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार टाटा सन्स (Tata Sons) ने एअर इंडियावर लावण्यात आलेली बोली जिंकली आहे. जेआरडी टाटा (JRD Tata) यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली.



एअर इंडियाच्या खरेदी प्रक्रियेतील विजेता निश्चित झाला आहे. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. एअर इंडियावरील मालकीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी टाटा समूहाची बोली ही अग्रेसर मानली जात आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.