diveagar-suvarn-ganesh-raigad


श्रीवर्धन सुवर्ण गणेश प्रतिष्ठापना करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन आणि दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांनी समन्वयाने करावी, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संबंधितांना दिले.



श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या श्रीसुवर्ण गणेशाचा मुखवटा घडविणे व प्रतिष्ठापना करण्यासाठीचा ताबा सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यासाठी शासनस्तरावर कार्यपद्धती निश्चित करावी अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. यापार्श्वभुमिवर राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.



श्रीगणेश मूर्तीची चोरी 23 मार्च 2012 रोजी झाली होती यामध्ये दरोडेखोरानी दोन सुरक्षा रक्षकांची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी 12 आरोपींना अटक करून शिक्षा झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राप्त मुद्देमाल राज्यशासनाची मालमत्ता आहे. सद्यस्थितीत हा मुद्देमाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने उप कोषागार, श्रीवर्धन येथे पोलीस सुरक्षेमध्ये आहे.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुद्देमालापासून सुवर्ण गणेशाच्या आधीच्या मुखवट्याप्रमाणेच नवीन मुखवटा तयार करुन त्याची प्रतिष्ठापना करण्यात यावी

सुमारे 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना लवकरच होणार असल्याने, राज्य शासनाने याबाबत घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला.

– खासदार सुनील तटकरे


याप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे उप सचिव (विशेष) संजय सक्सेना, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, रायगड अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे व दिवे आगरचे सरपंच व सुवर्ण गणेश मंदिराचे विश्वस्त बाळकृष्ण बापट यावेळी उपस्थित होते.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.