sunil tatkare met nitin gadkari


गेले १० वर्षे कोकणकर सर्वात जास्त त्रस्त असलेल्या मुंबई- गोवा महामार्गासंदर्भात खा. सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महामार्ग लवकर पूर्ण करण्यात यावा यासंदर्भात रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला आहे.



पळस्पे ते इंदापूर हे काम खाजगीकरणातून होत आहे व हा पट्टा डांबरीकरणाचा असणार आहे. परंतु या मार्गाच्या पृष्ठभागाचे काँक्रीटीकरण करावे व त्यासाठी 200 करोड अधिकच्या निधीची गरज असल्याचे खा. तटकरे यांनी मंत्री गडकरींच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा तात्काळ ना. गडकरी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.



किल्ले रायगडावरती जाणारा रस्ता ऐतिहासिक बनवा:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा विचार करून तिथे जाणाऱ्या रस्त्यावरती शुशोभीकरण पॉईंट्ससह ऐतिहासिक साईनबोर्ड लावावेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दर्शविणारी स्मारके विचारात घेऊन किल्ले रायगडावरती जाणारा रस्ता ऐतिहासिक बनवावा, अशी विनंतीही खा. तटकरे यांनी ना. नितीन गडकरीयांना केली.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.