no-to-drugs-addiction


देशात अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज, गांजा आणि ‘ब्राऊन शुगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरॉईनचं व्यसन करणे कायद्याने गुन्हा असूनही देशभरात विशेषकरून तरुण पिढी अशा पदार्थांच्या व्यसनात गुरफटली गेली आहे. बंदी असूनही इतके वाईट प्रकार घडत आहेत आणि त्यात काही राजकारणी आणि सेलेब्रिटी मंडळी अशा पदार्थांना कायदेशीर मान्यता द्यावी म्हणून मागणी करत आहेत. समजा मान्यता असेल तर मग देशाला किती हि कीड गिळंकृत करेल याचा विचार न केलेलाच बरा.



सगळ्यात जास्त ड्रग्सची कीड हि बॉलिवूडला लागलेली आपण जाणतोच. मोठमोठ्या सेलिब्रिटींची मुले यात अडकलेली आपण पहिली आहेत. अनेक निर्मात्यांनी ड्रग्सविरोधात सिनेमेही काढले परंतु परिस्थिती काही सुधारलेली दिसली नाही.



चित्रपटात किंवा कोणत्या जाहिरातीत दारू किंवा सिगरेटचा प्रसंग असल्यास बाजूला ‘धूम्रपान आरोग्यास घटक आहे’ असा मेसेज दिला जातो. तंबाखू किंवा गुटखा घेताना त्यावरती फोटोसहित दुष्परिणाम दिलेले असतात परंतु घेणारा व्यसनी माणूस त्याकडे कानाडोळा करून सऱ्हास व्यसन करत असतो. सरकारला दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांमधून मजबूत महसूल मिळत असतो, त्यामुळे व्यसन हे चालूच असत.



ड्रग्स शरीरात काही काळासाठी तरतरी आणते म्हणून अनेक खेळाडूसुद्धा डोपिंग चाचणीत अडकलेले आपण पाहतो. परंतु सतत ड्रग्स घेतल्याने शरीरावर गंभीर परिणाम होत असतात.

ड्रग्सचे सेवन केल्यानंतर चेतासंस्थेवर अपाय होतात. नैराश्‍य, झोपाळूपणा, उदासीनता, डोकेदुखी, भोवळ, स्मृती कमजोरी अशा समस्याही उद्‌भवतात, असे तज्ज्ज्ञ सांगतात.

ड्रग्जचे सेवन अपायकारक असून, यामुळे मानसिक बदल होऊ शकतात. अतिसेवनाने शरीरातील ऑक्‍सिजन कमी होतो, अशाने हृदयाचे कार्य अतिवेगवान होते तसेच किडनी, लिव्हर संबंधित समस्यांसह विविध अपाय शरीराला होऊ शकतात.

ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांची विक्री खुल्याने होत नसली तरी कोडवर्ड वापरून मोठी किंमत देऊन ड्रग्स खरेदी केली जाते. काही झालं, तरी मोहात पडू नका. मित्रांनाही फोर्स केला तरी नाही म्हणता आलं पाहिजे. पालकांनीही विशेषतः लहान मुला-मुलींवर नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

आकडेवारीनुसार महाराष्ट्रात तीन वर्षांत अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तब्बल १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. ड्रग्स मिळण्यासाठी अनेकांनी खून केले असून बलात्कार आणि अपहरणाचे अनेक किस्से या ड्रग्सच्या व्यसनामुळे घडले आहेत.

त्यामुळे जितके शक्य होईल तितके चांगले मेसेज आणि सकारात्मक गोष्टींजवळ राहण्याचा प्रयत्न या दूषित वातावरणात आपण केला पाहिजे. अंमली पदार्थांबद्दल खूप गैरसमज असतात. अंमली पदार्थ घेतले की आनंद मिळतो, सगळ्या समस्या सुटतात असे मानले जाते. कधी मित्रांच्या आग्रहामुळे सवय लागते. अंमली पदार्थ घेतले की तात्पुरते बरे वाटते. मात्र, एकदा सवय लागली की नंतर नशा येत नाही. नशा उतरली की त्रास सुरू होतो. आणखी व्यसन करायची इच्छा होते. मात्र, यातून मुक्ती शक्य आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.