Banglore_incident_CSM


कर्नाटकची राजधानी असलेल्या बँगलोरमध्ये 16 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर बेळगाव, कोल्हापूर भागात नागरिकांनी या घटनेविरोधात रसत्यावर उतरत संतप्त भावना व्यक्त केल्या.



या दरम्यान कन्नड व्यावसायिकांचे हॉटेल्सुद्धा बंद करण्यात आली. बेळगावामध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती असून पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केलं आहे. शनिवारी १८ डिसेंबर सकाळी 8 ते रविवार सकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे.



कर्नाटक पोलिसांनी श्रीराम सेना हिंदूस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह 25 ते 30 शिवभक्तांना मध्यरात्री अटक केली आहे.



शिवसेना नेते आणि सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून “कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा जर समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र हा स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही यावेळी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.