Rohit Sharma at Alibag


भारताच्या टी-20 आणि वनडे टीमचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा आता अलिबागकर झाला आहे. रोहित शर्माला अलिबागची भूरळ पडली असून अलिबागजवळ त्याने ४ एकर जागा खरेदी केली आहे. मांडवा बंदरापासून जवळच सारळ इथं ही जागा आहे.



या जागेचा व्यवहार ९ कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती मिळते. या जागेचे खरेदीखत रजिस्टर करण्यासाठी रोहित शर्मा हा आपली पत्नी रितिका हिच्यासह अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आला होता.



रोहित शर्मा आल्याचे कळताच त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. याआधी स्टार क्रिकेटर विराट कोहली, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, माजी कोच रवी शास्त्री आणि धडाकेबाज गोलंदाज अजित आगरकर यांनीही अलिबागमध्ये प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे.



तसेच रोहित शर्मा पाठोपाठ ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे देखील लवकरच अलिबागकर होणार आहेत. अलिबाग तालुक्यात ते जागा आणि रो हाऊस खरेदी करणार असल्याचे समजते.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.