ncp-mangaon-candidates-for-nagarpanchayat-election-2021


येत्या 21 डिसेंबर रोजी माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले सर्व 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असून आठ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज माणगाव प्रशासकीय भवन याठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे सादर करण्यात आले. राष्ट्रवादीचे उर्वरित नऊ उमेदवार 7 December 2021 शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.



  • वॉर्ड क्र. 3 मधून माजी नगराध्यक्ष आनंद यादव,
  • वॉर्ड क्र.14 मधून मयूर शेट,
  • वॉर्ड क्र.9 मधून रश्मी मुंढे,
  • वॉर्ड क्र.13 मधून भानुमती शेठ,
  • वॉर्ड क्र.2 मधून सुविधा खैरे,
  • वॉर्ड क्र.12 मधून माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव,
  • वॉर्ड क्र. 17 मधून बाळकृष्ण रातवडकर,
  • वॉर्ड क्र.10 मधून माजी नगरसेविका रिया उभारे
    यांनी आपले उमेदवारीचे नामनिर्देशन अर्ज आज दाखल केले


राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सकाळी माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या निवासस्थानी पक्षाच्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते. त्यावेळी महादेव बक्कम, इकबाल धनसे, काका नवगणे, प्रदेश राष्ट्रवादीचे युवक सचिव दीपक जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. नंतर प्रशासकीय भवन माणगाव याठिकाणी नामनिर्देशन अर्ज सादर केले.



याप्रसंगी तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र मोरे, माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण, तालुका उपाध्यक्ष गणेश चव्हाण, शहराध्यक्ष महामूद धुंदवारे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, माजी नगरसेवक जयंत बोडेरे, नितीन वाढवळ, माजी नगरसेविका सानिया शेट, माजी स्वीकृत नगरसेवक हेमंत शेट, माजी शहराध्यक्ष सचिन देसाई, सिद्धांत देसाई, चेतन गव्हाणकर, नामदेव खराडे, मोहन रातवडकर, सरफराज काझी, सरफराज अत्तार, तन्मय यादव, तनिश यादव, विरेश येरुणकर, महेंद्र रातवडकर, माजी नगरसेवक, नगरसेविका व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.