Maharashtra-honour-killing


सध्या महाराष्ट्रात घडलेल्या ऑनर किलींगच्या एका घटनेनं सगळ्यांना हादरवून सोडलेलं आहे. औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील गोये या गावामध्ये खोट्या प्रतिष्ठेच्या नादात आई आणि भावानेच तरुणीचं शीर धडावेगळं करत तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. आई-वडील आणि भावंडांच्या विरोधात जाऊन या तरुणीनं प्रियकराबरोबर पळून जात विवाह केला होता.



धक्कादायक बाब म्हणजे हत्या करण्यात आलेली तरुणी ही दोन महिन्यांची गरोदर होती. याबाबत कल्पना असतानाही कशाचाही विचार न करता तिची अत्यंत निर्घृणप्रकारे हत्या करण्यात आली. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मृत कीर्ती उर्फ किशोरी मोटे ही तरुणी आणि अविनाश थोरे हे दोघंही गोयगाव येथीलच होते. अंदाजे अवघी 500 लोकसंख्या असलेलं हे गाव असून अविनाश हा गावापासून अंदाजे 2-3 किलोमीटर असणाऱ्या शेतवस्तीवर राहतो.



किशोरी आणि अविनाश हे शिकायला एकाच महाविद्यालयात होते. महाविद्यालयात असताना या दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. मात्र किशोरीच्या कुटुंबीयांचा त्या दोघांच्या नात्याला प्रतिष्ठा आणि मुलाकडचे गरिबी विरोध होता. मात्र अविशा आणि किशोरी यांचं एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन केले लग्न.



आधी आईने मुलीची भेट घेतल्यानंतर अंदाजे आठवडाभरानं सोमवारी 5 डिसेंबर 2021 रोजी पुन्हा आपल्या मुलासोबत लाडगाव शिवारातील तिच्या सासरच्या घरी तिला भेटण्यासाठी आले. आई आणि आपला भाऊ आलेला पाहून काम सोडून आनंदानं त्या पळत आल्या आणि त्यांना भेटल्या. त्यांना आनंदाने पाहून नंतर किशोरी चहा करत होत्या, त्याचवेळी शोभा आणि संजय म्हणजे आई आणि भावानं त्यांची निर्घृणपणे हत्या केली.

धारदार शस्त्रानं संजय मोटे यांनी किशोरी यांच्या गळ्यावर सपासप वार केले आणि त्यांचं शीर धडापासून वेगळं केलं. या संपूर्ण प्रकारादरम्यान आई शोभा मोटे यांनी किशोरीचे हात-पाय धरून ठेवले होते. धडावेगळं केलेलं शीर संजय मोटे यांनी बाहेर आणून त्याठिकाणी असलेल्या लोकांना दाखवलं आणि त्यानंतर ते शीर अंगणामध्ये ठेवून ते त्याठिकाणाहून निघून गेले.

मृत किशोरी या दोन महिन्यांच्या गरोदर होत्या हे त्यांच्या आई शोभा मोटे यांना माहिती असूनही तरीही कशाचाही विचार न करता अत्यंत निर्घृणपणे या दोघांनी त्यांची हत्या केली. स्वतःच्या आईने या घटनेत सहभाग घेतल्याने अनेकांच्या ते पचनी पडले नाही. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.