laxman-utekar


लक्ष्मण उतेकर हे नाव फारच कमी जणांना माहित असेल. परंतु आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीच्या जोरावरती आज बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण करून एक यशस्वी दिग्दर्शक बनलेले आहेत.



कार्तिक आर्यन आणि क्रिती सिनॉन सोबत लक्ष्मण उतेकर

यशस्वी दिग्दर्शक असले तरी सुरुवातीचा प्रवास मात्र खूप खडतर होता. ऐन तारुण्यात पोलादपूरहून काम मिळावे या हेतूने ते मुंबईत आले. मुंबईत कोणतीही ओळख किंवा सेटल फॅमिली नसल्यामुळे सुरुवातीला चक्क त्यांना वडापाव गाडी चालवावी लागली, पण मनात मात्र काहीतरी बनायचच हि जिद्द होती.



एके दिवशी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची वडापावची गाडी जप्त केली आणि हीच वेळ करिअरला कलाटणी देणारी ठरली. त्यांनी एका वर्तमानपत्रात एडिटिंग स्टुडिओमध्ये सफाई कामगार नोकरीची जाहिरात पहिली आणि तिथे सफाई कामगार म्हणून नोकरी मिळवली.



एडिटिंग स्टुडिओमध्ये नोकरी असल्यामुळे त्यांना स्टुडिओ मधील कामका , कॅमेरा, लाईट आणि इतर कामाची पद्धत जवळून पाहता आली. हळूहळू काम पाहत ते स्वतः कॅमेरा अटेंडंट, चीफ कॅमेरा अटेंडंट, कॅमेरामॅन बनले.

त्यांनी एक प्रोमो डायरेक्ट करून त्यांना २००७ साली राजस्थानमध्ये एक अल्बम शूट करण्याचे पहिले काम मिळाले. त्यानंतर मात्र लक्ष्मण उतेकर यांनी मागे वळून पहिले नाही.

२००७ साली खन्ना अँड अय्यर चित्रपटाची सिनेमोटोग्राफी त्यांनी केली अँड नंतर २०१२ श्रीदेवीच्या “इंग्लिश विंग्लिश” चित्रपटाची सिनेमोटोग्राफी त्यांनी केली. २०१३ मध्ये त्यांनी मराठी चित्रपट “टपाल” दिग्दर्शित केला तोही आपल्या पोलादपूरमधील ग्रामीण भागातील कलाकार घेऊन.

Laxman-Utekar-tapaal-screening-with-sridevi

त्यानंतर शाहरुख खान आणि आलियाचा “डिअर जिंदगी” चित्रपटाची सिनेमोटोग्राफी त्यांनी केली. २०१९ मध्ये कार्तिक आर्यन आणि क्रिती सिनॉनला घेऊन “लुका छुपी” चित्रपट दिग्दर्शित केला. आणि याच वर्षी त्यांनी क्रिती सिनॉन व मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्यासोबत “मिमी” चित्रपट बनवला. आता लक्ष्मण उतेकर हे प्रोड्युसरच्या भूमिकेत असून लवकरच “इत्तू सी बात” या नवीन चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

पोलादपूरचे, रायगडच्या मातीतले लक्ष्मण उतेकर यांचा आलेख हा चढताच असून त्यातून आपल्यालाही प्रेरणा मिळते. त्यांच्या पुढील वाटचालीस रायगड एक्सप्लोअर तर्फे खूप खूप शुभेच्छा !


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.