raigad-nagarpanchayat-election-declared


रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणूका जाहिर झाल्या असून यासाठी २४ नोव्हेंबर पासून आचारसंहीता लागू झाली आहे. 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे.



यासाठी 1 ते 7 डिसेंबर कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी 8 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. तर 22 डिसेंबरला मतमोजणी होईल.


राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्वाचित) या सहा नगरपंचायतींच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे येथे प्रचाराचा धुरळा उडणार आहे.



जिल्हा परिषदेसह आगामी नगरपंचायत, नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, आपल्या परंपरागत मित्र पक्षांनासोबत घेऊन लढणार आहे. राज्यात महाआघाडीमधील घटक असलेल्या शिवसेनेसोबत युती करणार नाही, असा शब्द राष्ट्रवादीने सुरेश लाड यांना दिला असल्याचे बोलले जाते आहे.

23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. जिल्ह्यामध्ये स्थानिक निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेसोबत आघाडी करणार असल्याचा सुगावा लागल्यामुळेच लाड यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. यानंतर राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी मध्यस्थी केेली. लाड यांनीही त्यांना हवा असलेला शब्द घेतल्यानंतर आपला राजीनामा मागे घेतला आहे.

सुरेश लाड यांची जिल्हा अध्यक्ष पदावर पुन्हा काम करण्याची मनधरणी करण्यात यशस्वी झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुका समविचारी आणि परंपरागत मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याचे जाहीर केले.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.