shantanu-raydu-ratan-tata

देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या रतन टाटा त्यांच्या ८४व्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडिओत ते एका २७ वर्षीय तरुणासोबत दिसत आहेत. सुरुवातीला अनेकांना तो तरुण त्यांचा नातेवाईक असल्यासारखं वाटला परंतु तो तरुण त्यांच्या नात्यातील कोणीही नसून चक्क रतन टाटा यांचा सेक्रेटरी शंतनू नायडू आहे.



रतन टाटा यांचा सेक्रेटरी फक्त २७ वर्षीय तरुण असून हा एवढ्या कमी वयात टाटांच्या सेक्रेटरी पदापर्यंत कसा पोहचला हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचा सेक्रेटरी पर्यंतचा प्रवासही रंजकच आहे.



शंतनू नायडू यांना एकदा एक कुत्रा रस्त्यावर मृत अवस्थेत दिसला. वाहन चालकाला अंधारात कुत्रा दिसला नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे त्याच्या लक्षात आले. अशा भटक्या कुत्र्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी शंतनू नायडू याने स्वतःची एक स्टार्ट-अप कंपनी चालू केली. त्यात तो कुत्र्यांसाठी काळोखातसुद्धा चमकेल अशी डॉग-कॉलर (मानेचा पट्टा) बनवू लागला.



शंतनूची कि कन्सेप्ट उद्योगपती रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचली. रतन टाटासुद्धा प्राणीप्रेमी असल्याने शंतनू नायडूची ही कल्पना रतन टाटा यांना आवडली. नंतर रतन टाटा यांनी नायडूंना करण्यास मदत केली आणि पुढे रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांसोबत गायींसाठी हि कल्पना वापरली गेली.

रतन टाटा आणि शंतनू यांच्या वयात सुमारे 60 वर्षांचा फरक असूनही दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. शंतनूचे उच्च शिक्षण कॉर्नेल विद्यापीठात झाले आहे. शंतनू नायडू त्याचे शिक्षण पूर्ण करून भारतात परत आला तेव्हा रतन टाटा यांनी त्याला सेक्रेटरी बनण्याची ऑफर दिली. शंतनू रतन टाटा यांच्या ऑफिसमध्येही काम करतो आणि अपघात झालेल्या भटक्या प्राण्यांना मदत करण्यासाठी ते एकत्र काम करतात.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.