RZP Adhikari Mahendra K


रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. जिल्ह्यात ६ जानेवारी च्या कोविड अहवालानुसार या एकाच दिवशी तब्बल १ हजार ९६ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील लसीकरण व कोविड-१९ उपाययोजना व त्याविषयीची पूर्वतयारी याबाबत दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.



यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व संबंधित अधिकार्‍यांना कोविड केअर सेंटर सुसज्ज ठेवावेत, प्रत्येक तहसील कार्यालयात कंट्रोल रूम तयार करावा, नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे, कोविड चाचणी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर भर द्यावा, हाय रिस्क कॉन्टॅक्टची तात्काळ कोविड चाचणी करावी, ज्याच्यामुळे संसर्ग वाढू शकतो त्यांना तात्काळ शोधून आवश्यकता असल्यास त्यांच्यावर योग्य उपचार सुरू करावेत, गृह विलगीकरणातील रुग्णांना फोनद्वारे संपर्क करावेत, त्यांना घरातच राहण्यासाठी आवाहन करावे असे स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले आहेत.



या बैठकीला अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.



 कोविड केअर सेंटर मधील स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीकल अशा सर्व प्रकारच्या यंत्रणा व्यवस्थित असल्याची खात्री करावी, अग्निशमन यंत्र कार्यान्वित असल्याबाबतची खात्री करावी, हे अग्निशमन यंत्र योग्य ठिकाणी दर्शनी भागात, पटकन हाताशी लागतील, या पद्धतीने ठेवावेत, नागरिकांच्या अँटीजेन चाचणी, आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआर चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, गृह विलगीकरण, गरज लागल्यास संबंधितास कोविड केअर सेंटर मध्ये पाठविणे, त्यापुढेही गरज लागल्यास तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार याबाबत नागरिकांना जागरूक ठेवावे, खेळांच्या स्पर्धा, लहान-मोठे लग्न समारंभ, इतर कार्यक्रम रद्द करावेत, लसीकरणावर भर द्यावा.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.