Assembly Election restrictions 2022


2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी कधी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.

रोड शो, रॅली, पदयात्रा, कुठल्याही प्रकारच्या रॅलीला परवानगी नसेल. इतकंच काय तर रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत रॅली, सभांना परवानगी असणार नाही, असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कॉर्नर सभा, गावागावात होणारा प्रचार याबाबतही जर नियम पाळले गेले नाही, तर कडक कारवाई केली जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.



ऑफलाईन अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर निवडणूक आयोगानं बंधनं घातली आहे. 15 जानेवारीपर्यंत महत्त्वाच्या बाबींवर बंदी घातली असून ही बंदी कायम राहणार की नाही, याबाबतची माहितीही 15 जानेवारीनंतर जारी केली जाणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह मणिपूर आणि उत्तरांखंडमध्ये होणाऱ्या प्रचारावर आता निवडणूक आयोगाची बारीक नजर असणार आहे.



प्रचारसभा, रॅली, बाईक रॅली, व्हेईकल रॅली, अशा कोणत्याही प्रकारच्या ऑफलाईन प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. दरम्यान, या बंदीबाबतचा पुढील निर्णय 15 जानेवारीची कोरोना परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे.



५ राज्यांच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

उत्‍तर प्रदेश
14 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – 7 टप्प्या
मतदान दिनांक: 10 फेब्रुवारी , 14फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च
निकाल – 10 मार्च

पंजाब
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
मतदान दिनांक: 14 फेब्रुवारी
निकाल – 10 मार्च

उत्‍तराखंड
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? -एकच टप्पा
मतदान दिनांक: 14 फेब्रुवारी
निकाल – 10 मार्च

गोवा
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
मतदान दिनांक: 14 फेब्रुवारी
निकाल– 10 मार्च

मणिपूर
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – दोन टप्प्यात
मतदान दिनांक: 27 फेब्रुवारी, 3 मार्च
निकाल – 10 मार्च


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.