poladpur-nagarpanchayat-election-2022


उद्या निकाल; गुलाल कोण उडवणार याकडे सर्वांचे लक्ष



पोलादपूर – संदिप जाबडे दिनांक – १८ जानेवारी २०२२
पोलादपूर(रायगड)- पोलादपूर नगरपंचायत दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया १८ जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाली. नामाप्र प्रभागांचे आरक्षण सर्वसाधारण झाल्यानंतर उर्वरित ०४ जागांची मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. सकाळी कडकडीत थंडी असल्याने मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पहावयास मिळाली. परंतु दुपारच्या व सायंकाळच्या सत्रात मतदारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत झालेल्या मतदानात ८६.२८% इतके मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली.



 झालेल्या मतदानामध्ये प्रभाग क्रमांक ०२ मधील एकूण ३८० मतदानापैकी ३२२ मतदान(सरासरी ८४.७४%), प्रभाग क्रमांक ०८ मधील एकूण ३४८ मतदानापैकी ३०१ मतदान(सरासरी ८६.४९%), प्रभाग क्रमांक १० मधील २८७ एकूण मतदानापैकी २४७ मतदान(सरासरी ८६.०६%) तर प्रभाग क्रमांक १४ मधील १३७ एकूण मतदानापैकी १२४ मतदान (सरासरी ९०.५१%) झाल्याची माहिती पिठासिन अधिकारी महादेव रोकडे यांच्याकडून प्राप्त झाली.


पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा (७१.०९%), दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी(८६.२८%) अधिक होती. यावरूनच दुसऱ्या टप्प्यात अधिक चुरशीच्या लढती रंगणार असल्याचे भाकीत राजकीय विश्लेषक करीत आहेत.

दिग्गजांचे भविष्य ई व्ही एम मध्ये कैद; उद्या गुलाल कोण उढवणार..??

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भाजपा या तिन्ही पक्षांनी तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. यातच या दिग्गजांचे ई व्ही एम मशिन मध्ये कैद असणारे भविष्य येत्या २४ तासांमध्ये उघडणार असून गुलाल कोण उडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.