State-Government-about-corona-rules


राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येमुळं निर्बंध लागू केले होते.



ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचं 90 टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचं 70 टक्के लसीकरण झालंय याशिवाय 15 ते 18 वयोगटातील मुलांचं राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाण लसीकरण झालं आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.



राज्य सरकारच्या या आदेशाचा 11 जिल्ह्यांना फायदा होणार आहे. मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना सूट नव्या आदेशानं फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या नव्या आदेशानं चौपाट्या, स्विमिंग पूल, वॉटर पार्क, गार्डन आदी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

काय सुरु राहणार?



  • इमॅजिका/ एस्सेल वर्ल्डसारखे पार्क 50% क्षमतेनं सुरु राहणार
  • स्विमिंग पूल,वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
  • हॉटेल, थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
  • लग्नासाठी 200 जणांना परवानगी
  • अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादानाही
  • स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार
  • अम्युजमेंट/थीम पार्क 50 टक्के उपस्थितीत खुली होणार
  • वॉटर पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के उपस्थितीत सुरू होणार
  • सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी
  • सर्व राष्ट्रीय पार्क आणि सफारी
  • पर्यटन स्थळ पुन्हा सुरू होणार
  • सलून, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
  • सलून आणि ब्युटी पार्लर च्या नियम प्रमाणे स्पा 50 उपस्थितीत टक्के सुरु करण्याची परवानगी
  • रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह 50 टक्के उपस्थितीत सुरू
  • भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के उपस्थितीत हॉलमध्ये घेता येणार आहेत
  • लग्न समारंभ 25 टक्के लोकांच्या उपस्थितीत हॉल सुरु होणार
  • खेळाच्या स्पर्धा घेण्यासाठी लोकांची 25 टक्के उपस्थिती

    नाईट कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राहणार

राज्य सरकारनं जाहीर केलेली नवी नियमावली आजपासून लागू करण्यात येणारअसून महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्यानं ठाकरे सरकारनं अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. जे आस्थापना सुरु होतील तेथील कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं आवश्यक आहे. तर, येणाऱ्या ग्राहकांचं देखील लसीकरण झालेलं असणं आवश्यक आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.