bhogve-grampanchayat


पोलादपूर – प्रतिनिधी | पोलादपूर(संदिप जाबडे) – तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भोगावं खुर्द च्या वतीने रविवार ३० जानेवारी रोजी १५ वित्तीय योजनेतून ग्रामस्थांना लाभ, २०२१-२२ वर्षातील घरपट्टी माफ व रास्त धान्य दुकानाचे उद्घाटन आदी विविध कामाचे भूमिपूजन व उद्घाटन उद्घाटन आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले.



भोगाव खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच व तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उतेकर यांनी आपण सरपंच पदावर रुजू झाल्यापासून केलेल्या विकासकामांना उजाळा दिला. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या परिस्थितीत भोगाव खुर्द ग्रामपंचायतीने भारताच्या पंतप्रधानांनी भारतात टाळेबंदी करण्याच्या एक दिवस आधीच गावात टाळेबंदी लागू करून लोकांना उपाशी न ठेवता गावातील सर्व नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी स्वतः च्या अंगावर घेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरोघरी जाऊन केल्याने कोरोना नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे सांगितले. या काळात सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने २०२१-२२ या वर्षात घरपट्टी माफ करीत लोकांना दिलासा दिल्याचेही आवर्जून सांगितले.



ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच ग्रामपंचायतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे करू शकल्याने सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.



जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी पोलादपूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, भासणारी पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत आपल्यामार्फत सुरू असलेले प्रयत्न उपस्थितांसमोर अधोरेखित केले. राकेश उतेकर हा अभ्यासू सरपंच आहे असून २० कलमी कार्यक्रम ग्रामपंचायतीमध्ये आहे. त्याच्यासारखे हुशार आणि कार्यतत्पर सरपंच लाभल्याने आपण तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करू शकल्याचे समाधान व्यक्त केले.

भोगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात आपण विकासकामे केल्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, भोगावं गावामध्ये येणाऱ्या रस्त्याचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही उपस्थितांना दिली. तर मतदारांनी देखील विकासकामे करणाऱ्या, समस्या सोडविनाऱ्या पक्षासोबत राहायचे की अन्य कोणासोबत याचा विचार करावा असा खोचक सल्ला प्रसंगी बोलताना दिला.

नागरिकांनी कशेडी येथे सुरू असलेल्या बोगद्याला सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली बोगदा असे नाव देण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती आमदार गोगवलेना केली.

कार्यक्रमाला आमदार भरत गोगावले, परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, पोलादपूर तालुका रहिवाशी संघ पुणे अध्यक्ष किसन भोसले,सह्यायक गटविकास अधिकारी यादव मॅडम,तालुकाप्रमुख निलेश अहिरे, समाजसेवक मनोहर चिकणे, उद्योजक संतोष मेढेकर, सहाय्यक पो. निरीक्षक प्रशांत जाधव, किशोर जाधव,राजू कदम, सचिन पार्टे आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.