balaram-patil-about-n-d-patil


प्रा. एन डी पाटील यांच्या जाण्याने पुरोगामी विचारांचा अस्त झाला !



पोलादपूर – संदिप जाबडे.. दिनांक – २३ जानेवारी २०२२-
पोलादपूर(रायगड) – प्राध्यापक एन डी पाटील यांनी ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रात ते अग्रस्थानी राहिले मग शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्याबरोबर एखादी चळवळ असो किंवा शेतकरी आंदोलन असो अशा सर्व क्षेत्रात एन डी पाटील यांनी केलेले काम आणि कार्य आपल्या सर्वांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडीचे कोकण विभाग आमदार बाळाराम पाटील यांनी पोलादपूर येथील शोक सभेत बोलताना व्यक्त केले.



रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष,तथा ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्राध्यापक एन डी पाटील यांचे नुकतेच निधन झाल्याने विद्यामंदिर पोलादपूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.



पुढे ते म्हणाले की एन डी पाटील हे विचारवंत होते शिक्षण तज्ञ होते कृषी तज्ञ होते अंधश्रद्धा निर्मूलन तज्ञ होते ते ज्या ज्या क्षेत्रांमध्ये काम करत होते त्या त्या क्षेत्रातील जाणकार मंडळी त्यांचा आदर्श घेऊन चळवळ पुढे नेत होते त्यांनी ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रात ते नेहमीच अग्रस्थानी राहिले कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना ते एकनिष्ठ राहून काम करत होते ही त्यांची धारणा होती आमच्या सारखा छोटा कार्यकर्ता त्यांच्या परंपरेत जगलो मात्र राजकीय क्षेत्रात वावरताना समाजाच्या समाधानासाठी कधीकधी तडजोडी कराव्या लागतात त्यांच्या संस्काराने काम करतो मग प्राध्यापक एन डी पाटील असतील दि. बा. पाटील असतील किंवा गणपतराव देशमुख असतील अशा दूरगामी विचारांचे ज्येष्ठ पाईक यांच्या संस्काराचा वारसा घेऊन समाजाच्या हितासाठी काम करतो.

महाराष्ट्राच्या सामाजिक परिघा कडे नजर टाकली तर हा परीघ सुना सुना लागतो एक काळ असा होता समृद्ध परंपरा व पुरोगामी विचारांचे वलय महाराष्ट्र होते मात्र एन डी पाटील सर यांच्या जाण्याने शिक्षणक्षेत्राला आणि सामाजिक परिघाला त्यांची उणीव बसणार असून महाराष्ट्राचा बिहार उत्तर प्रदेश तर होणार नाही ना अशी खंतही आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केली. कारण ज्या प्रांतात एन डी सरांनी काम केले तेथे अग्रस्थानी राहिलेत्यांची त्यांची बांधीलकी चळवळीशी होती रायगडच्या सामाजिक राजकीय चळवळीतही सरांची काम आणि कार्य प्रेरणादायी असेच होते असे गौरवोद्गार शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी शोकसभेत बोलताना व्यक्त केले आहे.

यावेळी व्यासपीठावर विद्यामंदिर पोलादपूर चे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य निवास शेठ,सदस्य रामचंद्र साळुंखे, प्राचार्य हरिचंद्र जाधव, केंद्रप्रमुख सोपान चांदे, शेकापचे तालुकाध्यक्ष वैभव चांदे,पंचायत समितीची वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, शिक्षक नेते गुलाबराव येरुणकर, दत्तात्रेय उतेकर, नितीन माळवदे, संजय जैतपाळ, संजय जाधव, रवींद्र पारते, शिक्षकेतर संघटनेचे तालुका अध्यक्ष विद्याधर कोळसकर आदी मान्यवर व बहुसंख्येने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या शोकसभेस उपस्थित होते.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.