poladpur-voter-day-celebration-sunderrao-more-college


दिनांक – २५ जानेवारी २०२२. पोलादपूर(संदिप जाबडे)-
शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पोलादपूर तहसील कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता क्लबचे नोडल ऑफिसर प्रा. शैलेश जाधव आणि विद्यार्थी संयोजक श्री विवेक राठोड यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून प्रा शैलेश जाधव यांनी महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या नवमतदार नोंदणी शिबीर, तसेच अन्य मतदार जागृती कार्यक्रमांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदार दिनानिमित्त महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, घोषवाक्य इत्यादी स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली.



या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात तहसील कार्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा डॉ वसंत डोंगरे यांनी उपस्थित असलेल्या नवमतदारांना मतदार जागृतीपर शपथ दिली. तसेच या कार्यक्रमामध्ये पोलादपूरचे नायब तहसीलदार श्री समीर देसाई यांच्या हस्ते नवमतदार विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात स्वागतदेखील करण्यात आले. महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ प्रभाकर गावंड यांनी यावेळी लोकगीतावर आधारित स्वरचित मतदार जनजागृतीपर गीत सादर केले. यावेळी आपल्या प्रमुख मनोगतामध्ये नायब तहसीलदार श्री समीर देसाई यांनी मतदान हा लोकशाहीमध्ये प्राप्त झालेला सर्वात मौल्यवान अधिकार असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याला प्राप्त झालेल्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त करून नवमतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे श्री देसाई यांनी विशेष कौतुक केले.



आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिपक रावेरकर यांनी महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता क्लब द्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा उल्लेख करून या उपक्रमातून प्राप्त झालेले ज्ञान व माहिती फक्त स्वतः पुरती मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी आपापल्या गावांमध्ये, परिसरामध्ये लोकशाही आणि मतदानाचे महत्त्व याबद्दल जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आपल्या मनोगताच्या अखेरीस केले. या कार्यक्रमाला सर्कल श्री लक्ष्मीकांत सिनकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुनील बलखंडे तसेच रासेयोचे प्रा डॉ जयश्री पाटील – जाधव यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी कोरोना नियमांच्या अधीन राहून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आजीवन अध्ययन विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नाथीराम राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.