poladpur-voter-day-celebration


पोलादपूर- संदिप जाबडे | दिनांक – २३ जानेवारी २०२२
पोलादपूर(रायगड)- भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या मतदारांच्या जनजागृतीसाठी दरवर्षी साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालय पोलादपूर व शिक्षण विभाग पंचायत समिती पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चित्रकला, वक्तृत्व व निबंध यांचा प्रामुख्याने समावेश होता.



न्यू इंग्लिश स्कूल तूर्भे, शेलार मामा प्रशाला उमरठ, माध्यमिक विद्यालय संवाद अशा तालुक्‍यातील सर्वच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये हा कार्यक्रम मा.तहसीलदार दिप्ती देसाई व मा. गटविकास अधिकारी धनंजय जगताप साहेब, गटशिक्षणाधिकारी वृक्षाली यादव मॅडम, वरिष्ठ विस्ताराधिकारी सुभाष साळुंके यांनी शाळांना भेटी देऊन याबाबत मार्गदर्शन केले.



चित्रकला स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे मधील प्रतिक गणेश उतेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. तर सायली गणेश देवे द्वितीय क्रमांक व साहिल किशोर मोरे याने तृतीय क्रमांक मिळवला. शेलार मामा प्रशाला उमरठ मधील आकाश आनंत गोराने या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक, जय निवृत्ती पार्टे याने द्वितीय व दीप्ती चंद्रकांत कदम या विद्यार्थ्यांनी ला तृतीय क्रमांक मिळाला. माध्यमिक विद्यालय संवाद या विद्यालयातील श्रीनाथ दत्तात्रेय उतेकर याने प्रथम क्रमांक, अंजनी सुनील कोरडे हिने द्वितीय क्रमांक तर कल्याणी राजेश जंगम हिने तृतीय क्रमांक मिळवला.



सर्व सहभागी व यशस्वी स्पर्धकांचे संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तसेच विस्तार अधिकारी श्री. साळुंके साहेब, नायब तहसीलदार समीर देसाई साहेब तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी अभिनंदन केले. चित्र व शब्दांच्या माध्यमातून लोकशाहीचा अर्थ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार दिप्ती देसाई यांनी केले.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.