russi-ukraine-war-raigad-students-stucked


सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असतानाच आता रायगड जिल्ह्यातील २२ विद्यार्थी देखील युक्रेनमध्ये अडकले आहेत.



रायुक्रेनमध्ये अडकेले 22 विद्यार्थी हे पेण, पनवेल, खारघर येथील आहेत. याबाबत रायगडच्या जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरवर पालकांनी साधला संपर्क साधला आहे. रशिया-युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले आहे. अशात अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेने 40 विद्यार्थी युक्रेनला पाठविले होते. त्यापैकी अहमदनगर शहर व जिल्ह्यातील 18 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. युद्ध परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या एकाच संस्थेमार्फत 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले आहेत. इतरही संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले आहेत. अशातच आता रायगड जिल्ह्यातील देखील 22 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.



युध्द स्थितीमुळे युक्रेनमध्ये लोक चिंतेत आहेत. तेथील सुपर मार्केट बंद होत चालली आहेत. त्यातील किराणाही संपत चालला आहे. येथे वस्तू महाग मिळत आहेत. तसेच एटीएम बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. भारतीय एटीएम कार्डही बंद पडत चालले आहे अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.



दरम्याान, रशियासोबत दोन हात करण्यासाठी आम्हाला एकटं सोडण्यात आलं असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी तसेच रशियाने केलेल्या हल्ल्यात 137 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 316 जण जखमी आहेत. या युद्धात जगाकडूनही युक्रेनला मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. रशियाच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी युक्रेनला एकट सोडण्यात आलं असल्याचेही त्यांनी सांगितले.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

By raigad

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.