top-businessman-russia-ukrain


अखेर गुरुवारी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनसोबत युद्ध सुरु झाल्याची घोषणा केली आणि जगभरातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत काही तासात प्रचंड घसरण झाली आहे. युद्ध घोषणा होताच ३ ते ४ तासात जगातील टॉप १० अतिश्रीमंतांना तब्बल ३.११ लाख कोटींचा फटका बसला.



त्यात सर्वाधिक मोठा फटका जगातील सध्याचे १ नंबरचे श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांना बसला असून त्यांची संपत्ती १ लाख कोटींनी कमी झाली. युद्धाची घोषणा होताच जगातील सर्व शेअर बाजार धडाम कोसळल्याने या श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली आहे.



भारताचा विचार केला तर आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना २१८२० कोटींचा फटका बसला आहे. त्यापाठोपाठ गौतम अदानी यांना ९७८२ कोटीचे नुकसान सोसावे लागले आहे. सत्या नडेला, किशन बियाणी, दिलीप संघवी, उदय कोटक अश्या भारतातील टॉप १० मधील उद्योजकांचेही मोठे नुकसान झाले आहे. फोर्ब्सचे रिअल टाईम डेटा नुसार श्रीमंत उद्योजकांच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणवर घसरले आहेत. या पहिल्या दहा उद्योजकांना एकूण ६० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे समजते.



अमेरिका, भारत, जपान, चीन, ब्रिटनसह इतर अनेक देशात शेअर बाजार कोसळले आहेत. एलोन मस्क यांच्या प्रमाणे अमॅझॉनचे जेफ बेजोस यांना ४१३९० कोटी तर बिल गेट्स यांना १२७९३ कोटी, मार्क झुकेरबर्ग याला ९७८२ कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.