sachindada-dharmadhikari-awarded


पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटकडून ‘लिव्हींग लिजेंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सचिनदादा धर्माधिकारी यांना मानाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. सोबतच फेम टाईम इंटरनॅशनल ग्लोबल लिडरशीप अवार्डनेही त्यांना गौरवण्यात आले.



थायलंडमधील बँकॉक येथील रेनीसन्स येथे हा सोहळा 25 फेब्रुवारी संपन्न झाला. यावेळी युनिव्हर्सीटीचे डायरेक्टर जनरल डॉ. एडव्हर्ड रॉय, डॉ. चांग यान लँग, टीना यँग, डॉ. रॉबर्ट ब्रँड, आणि डॉ. आर परमेश्वर, डॉ. अजय देसाई उपस्थित होते.



महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या श्री समर्थ दासबोधाच्या निरुपणाची अखंड परंपरा, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरु आहे. त्यांच्या या कार्याबद्दल भारतातच नव्हे, तर परदेशातही गौरव केला जात आहे.



ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसह स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर, जलसंधारणाचे कार्य, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता आवश्यक असणारे प्रशिक्षण, तलाव-विहिर-धरण गाळ उपसा, ग्रामस्वच्छतेचे उपक्रम राबवत धर्माधिकारी प्रतिष्ठानने कार्य केले आहे. याची दखल घेवून युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटकडून डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘लिव्हींग लिजेंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर सचिनदादा धर्माधिकारी यांना मानाची डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.