mahad-chabina-utsav-2022


महाड येथे आजपासून छबिना उत्सवाला प्रारंभ होत असून महाशिवरात्रीदिनी जाखमाता देवीची पालखी मिरवणूक अगदी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात निघणार आहे.



मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे महाडचा छबिना उत्सव साजरा झाला नव्हता. मात्र यंदा हा छबीना उत्सव साजरा होणार असून खालूबाज्याच्या तालावर आणि महाड शहरातील देव-देवतांच्या आखाड्यासह काठ्यांसह मिरवणूक निघणार आहे.



गादी स्थापना व पेटी पूजन सकाळी १०:०० वाजता होणार असून मंगळवार १ मार्च महाशिवरात्रीदिनी श्री विरेश्वर महाराज छबिना उत्सवासाठी विरेश्वरांची बहीण म्हणजेच म्हाडाची ग्रामदेवता जाखमाता देवी येत असते.



देवस्थानच्या पंचकमिटीमार्फत योग्य नियोजनाने जाखमाता देवी पालखी सोहोळ्याने पायघड्या घालीत देवीला विरेश्वर मंदिरात आणतात. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने शिथिल निर्बंधांमुळे जाखमाता देवीची भव्य मिरवणूक आणि छबिना उत्सव महाडकरांना अनुभवता येणार आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.