bhendkhal stranger mix chemical in the water

उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे)- दिनांक 25/7/2022 रोजी रात्री उरण तालुक्यातील भेंडखळ गावा नजदिक असलेल्या खाडीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक पाणी टँकरद्वारे खाडीच्या पाणीत सोडले आहे. त्यामुळे सर्व मासे, जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत.यामूळे भेंडखळ ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसा पासून असे प्रकार सुरू आहेत.



या अगोदर सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत अशा घटना वारंवार का घडतात ? मागील काही दिवसांपासून अशा घटना घडून सुध्दा सदर अज्ञात व्यक्तीवर का कारवाई होत नाही ? पोलीस प्रशासन अशा घटना का रोखू शकत नाही. असा सवाल भेंडखळ मधील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.



बाहेरिल वाहने अंधाराचा फायदा घेउन अर्ध्या रात्री अशा केमिकल युक्त रसायनांचा साठा गुपचूपपणे खाडीमध्ये सोडतात अशाने पाण्यातील मासे, साप कासव आदी प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तर अनेक मासे प्राणी मृत्युमुखी पडतात. आणी हीच मासे स्थानिक नागरीकांनी खाल्ली तर त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.शासनाने या गोष्टीची खोलवर दखल घ्यावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भेंडखळ ग्रामस्थांनी केली आहे.



पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर व अवैध पद्धतीने रासायनिक द्रव्य भेंडखळ येथील खाडीत टाकणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला करीत आहोत.
-विजय भोईर. (इन्चार्ज – अँटी करप्शन आणि क्राईम कंट्रोल क्लब उरण.)



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.