rastrvadi-mahila-congress-mangalagaur-celebration

उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे)- राष्ट्रवादी महिला काँग्रेस उरण तालुका तर्फे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी हॉटेल कोटनाका उरण येथे मंगळागौर स्पर्धा 2022 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.



यावेळी या स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे . स्पर्धेसाठी महिला सक्षमीकरण, पर्यावरण विषयक जागरूकता, व्यसन मुक्ती, आरोग्यविषयक जागरुकता आदि विषय ठेवण्यात आले होते.



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित मंगळागौरी स्पर्धेत प्रथम क्रमांक जिजाऊ ग्रुप,द्वितीय क्रमांक उरण ब्राह्मण महिला शाखा,तृतीय क्रमांक एकविरा महिला नाच मंडळ मोठी जुई, चतुर्थ क्रमांक जोगेश्वरी महिला नाच मंडळ जासई तर उत्तेजनार्थ दोन बक्षीसे देण्यात आली.कुलदैवत महिलां नाच मंडळ मोठी जुई, मी मराठी महिला नाच मंडळ मोठी जुई यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.