cctv footage uran robbery

उरण दि. 26 (विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यात चोरिच्या अनेक घटना वाढत असून काही दिवसापूर्वी उरण मधील समुद्र‌किनारी असलेल्या नागाव येथे गाई गुरे शेळ्या बकऱ्या चोरिस गेल्या होत्या. त्यानंतर नवीन शेवा गावात 20 ऑगस्ट 2022 रोजी केशव हनुमंत घरत MH46C 1552 मोबाईल नंबर 9594254596 यांची रात्री रिक्षा चोरिला गेली.



ही घटना ताजी असतानाच दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 2 वाजता एका इको गाडी मध्ये नविन शेवा गावातील घरत आळीतील रस्त्यावरील गाईची वासरे चोरी करताना गावातील युवकांनी बघितली. सदर घटना तेथिल सी सी टि.व्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहेत . त्यामूळे उरण तालुक्यात चारिच्या घटनेत वाढ झाली असून या घटनेकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दयावे अशी मागणी नविन शेवा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत सदानंद म्हात्रे यांनी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.



उरण तालुक्यातील अनेक गावात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून या चोरीच्या घटनामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.