shivsena upjilhapramukh atul bhagat

उरण दि 30(विठ्ठल ममताबादे)- शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने भाजपसोबत सरकार स्थापन केले. खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावादेखील शिंदे करीत आहेत. शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्याचे काम राज्यभर सुरू आहे.रायगड जिल्ह्यातील उरण पनवेलमधील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश केला होता.शिंदे गटात गेलेल्या रामदास शेवाळे व प्रथमेश सोमण, अतुल भगत यांची महत्त्वाच्या पदांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केली आहे.



रायगड जिल्ह्यात नव्याने मोर्चेबांधणीचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले असून राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथील रत्नसिंधू बंगल्यावर पनवेल व उरण जिल्ह्याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना पदाचे लेखी पत्र देऊन पदाधिकाऱ्यांना मोर्चेबांधणीचे काम सुरू करण्यास सांगितले.यावेळी अतुल भगत यांना रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख पद देण्यात आले तर रामदास शेवाळे यांना पनवेल जिल्ह्याचा संपर्क नेता, पनवेलच्या महानगरपालिका क्षेत्रासाठी ऍड.प्रथमेश सोमण यांना पदभार पक्षाने सोपविला आहे. रूपेश ठोंबरे यांच्याकडे पक्षाने तालुकाप्रमुख ही जबाबदारी दिली असून माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य परेश पाटील यांना पनवेल विधानसभा मतदार संघ परिसरासाठी उपजिल्हा प्रमुख नेमण्यात आले आहे.



पनवेल विधानसभेची जबाबदारी परेश पाटील यांना देण्यात आली आहे. मुंबई येथील पदवाटप करण्याच्या कार्यक्रमावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे शिंदे गटाचे सचिव संजय मोरे, आमदार महेंद्र थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांसह रायगड उपजिल्हा प्रमुख पदी अतुल भगत यांची निवड केल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्र परिवार, हीतचिंतकांनी अतुल भगत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



पनवेल महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गट स्थानिक पातळीवर भाजपसोबत युती करण्याची शक्यता आहे. पालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आला नव्हता. त्यामुळे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.पुढील निवडणुका लक्षात घेऊन शिंदे गट अधिक जोमाने कामाला लागला असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात बघायवयास मिळत आहे.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.