उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे)- दिघोडे गावातील नुकसान ग्रस्त ग्रामस्थांना सिडकोकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी उरण तालुका काँग्रेसच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील यांनी दि 19/09/2022 पासून उरण तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दि 20/09/2022 रोजी उपोषणाचा दुसरा दिवस असून या उपोषण स्थळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी भेट दिली. सदर समस्या समजून घेउन या उपोषणाला कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपला पाठींबा जाहिर केला.व आपणही ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महेंद्र घरत यांनी यावेळी सांगितले.



17/12/2020 रोजी हेटवणे ते नवी मुंबई मार्गावरील सिडको प्रशासनाची जलवाहिनी फुटल्याने त्यातून वाहणाऱ्या वेगाच्या पाण्याने दिघोडे गावातील अनेक घरात पाणी घुसून घरांतील साहित्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते. 18 नुकसान ग्रस्त व्यक्ती बाधित असून या सर्वांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे महेंद्र घरत यांनी यावेळी आपल्या मनोगतातून सांगितले.



यावेळी महेंद्र घरत यांनी शासकीय अधिकारी यांना फोन करून सदर समस्या सोडविण्याची विनंती केली.उपोषण स्थळी दिघोडे गावातील ग्रामस्थ, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील , काँग्रेसचे ज्येष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,किरीट पाटील,अखलाक शिलोत्री, संध्या ठाकूर,शहराध्यक्ष प्रकाश पाटील, सेवादल अध्यक्ष कमळाकर घरत,अफशा मुकरी,लंकेश ठाकूर, यशवंत म्हात्रे, विवेक म्हात्रे,शैलेश तामगाडगे आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत उपोषण असेच पूढे सुरु ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.