(मुंबई प्रतिनिधी: महेश कदम)– वाकी बुद्रुक ता. महाड, जि. रायगड, येथील नवसाला पावणारी अशी प्राचीन काळापासून ख्याती असलेली डोंगरात वसलेली ग्रामदैवत आई. श्री. देवी सोमजाई देवस्थान, आई सोमजाई देवी स्वयंभू असून पुरातन जागृत देवस्थान मंदिर आहे, देवीचा महिमा आपल्या सर्व भक्तांना ज्ञात आहे. आई सोमजाईची विविध मुर्ती पाषाण काळातील आहेत.



परंपरेनुसार आईचा नवरात्री ऊत्सवाला आता सुरुवात होणार असून ग्रामस्थांच्या वतीने वर्षानुवर्ष हे उत्सव साजरा करण्यात येतो, सालाबाद प्रमाणे यंदा ही असाच उत्सव सोमवार दि. २६/०९/२०२२ पासुन ते बुधवार दि. ०५/१०/२०२२ दसरा पर्यंत भक्तिभावाने थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे, मंदिराच्या आवारात रांगोळी, दिवा रोशनीची सजावट केली जाते. खालील कार्यक्रमाची रुपरेषा आयोजीत करण्यात आली आहे.



सोमवार दि. २६/०९/२२ रोजी दुपारी २.०० वाजता. घटस्थापना असून दररोज सकाळी ८ ते ९ वाजता व सायंकाळी ६ ते ७ वाजता महाआरती होणार आहे व संपूर्ण ग्रामस्थ मंडळींकडून प्रतेक गावकरी ह्यांचा वतीने दररोज हरिजागर चा कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे, ह्यात गावठण, शिवाजीनगर, नानेमाची, नानेमाची आवाड, धनगरवाडी, शेवते, खरकवाडी, आंब्याचामाळ,आदिवासीवाडी, पेडामकरवाडी, नांद्रुकवाडी, नारायण वाडी, शेदुरमळई. असे प्रतेक गावकरी सहभागी असणार आहेत, सोमवार दि. ०३/१०/२२ रोजी सकाळी १०.०० वाजता दुर्गाअष्टमी निमित्त सोमजाई मंदिरा मध्ये होम हवन होणार असून येणारे सर्व भाविकांना रोज दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद दिला जाईल व दि. ०५/१०/२२ बुधवार दसराच्या दिवशी दुपारी २.०० वाजता बलिदान व विसर्जन करण्यात येणार आहे.



ह्या कार्यक्रमाला सोमजाई देवस्थान चे अध्यक्ष श्री. संजय गंगाराम कदम, उपाध्यक्ष श्री. प्रकाश चंद्रु दरेकर, सचिव श्री. श्रीरंग भागोजी भोसले, खजिनदार श्री. अमोल भाऊ जाधव सह विश्वस्त श्री. मोहन रामचंद्र म्हामुणकर, श्री. प्रदीप रघुनाथ कदम, श्री. गणपत विठोबा सालेकर, श्री. दिपक यशवंत कदम, श्री. प्रभाकर दिनकर म्हामुणकर, श्री. सदाशिव दगडु मोरे, श्री. सुरेश मोतीराम म्हामुणकर, श्री. रोहिदास रामा जाधव, श्री. बबन शिवराम मोरे सह गावचे सरपंच श्री. द्वारकानाथ जाधव सर ह्यांच्या उपस्थिती लाभणार आहे. तसेच अनेक मान्यवर व चाकरमणी दर्शनास येऊन आईची ओटी भरणार आहेत. तर सर्व भाविकांनी आईचा दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती सोमजाई देवस्थान चे पदाधिकारी, विश्वस्त व समस्त ग्रामस्थांनी केली आहे. आई सोमजाई देवीचा ऊदो ऊदो.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.