chhagan bhujbal controversy

सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत, कोणाला काय वाटेल ते करणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



छगन भुजबळ यांनी सरस्वती संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल नवा वाद निर्माण झाला असून यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटो संदर्भात वक्तव्य केले होते



यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी या वक्तव्यांवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भुजबळांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे. या कार्यक्रमप्रसंगी भुजबळ यांनी वरील वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हणाले कि, सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही असेही ते म्हणाले



काय आहे भुजबळांचे आक्षेपार्ह वक्तव्य ?

‘शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. आम्ही कधी पाहिलं नाही त्यांची पूजा कशासाठी करायची?, असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. महापुरुषांमुळे तुम्हा आम्हाला शिक्षण मिळाल, सगळं मिळालं यांची पूजा करायला हवी यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे’, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. भुजबळांनी केलेल्या या विधानावरून वातावरण तापल्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नाशिक पोलिसांकडून खबरदारी देखील घेतली जात आहे. त्यामुळे आता छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.