sunil tatkare on andheri election

अंधेरी मतदार संघात २०१९ मध्ये भाजपने अपक्ष उमेदवार उभा केला होता, त्यावेळी त्यांच्या पाठी कोणती शक्ती होती हे आता समोर आले आहे, असा थेट निशाणा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधला.



जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी खासदार तटकरे शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर होत असताना महाविकास आघाडीचे गठन करण्यात आले. आता राज्यात सत्तांतर झाले असले तरी महाविकास आघाडी अजूनही अस्तित्वात आहे. भविष्यात राजकीय परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सोबत राहावे, असा प्रवाह वरिष्ठ पातळीवरती आहे. अंधेरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून, पुढेही महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्याचा विचार वरिष्ठ नेते करतील, असे खासदार तटकरे म्हणाले.



ऋतुजा लटके यांनी एक महिना आधी राजीनामा दिला होता. त्यांचे एक महिन्याचे वेतन कोषागार कार्यालयातून जमा झाले होते. मात्र, त्यांचा निवडणूक लढविण्याचा हक्क डावलण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यासाठी त्यांना न्यायालयात दाद मागावी लागली. न्यायालयाने महानगरपालिकेच्या कृतीला चपराक दिले आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षाच्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला छेद देण्याच्या घटना घडत आहेत. वैचारिक लढाई लढली गेली पाहिजे, प्रत्येक पक्षाची विचारधारा आहे, प्रत्येकजण निवडणुकीला सामोरे जात असतो. जनता त्याबाबत योग्य तो निर्णय घेत असते. पण निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुद्दाम बाजूला करून निवडणूक लढता येऊ नये असे कृत्य शासन मान्य यंत्रणेच्या माध्यमातून करणे चुकीचे असल्याचे खासदार तटकरे म्हणाले.



सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी शिंदे आणि ठाकरे यांच्या यांच्यात सुरू असलेले राजकारण महाराष्ट्रासाठी घातक

– खासदार सुनील तटकरे


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.