उरण दि ८(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यात सर्व सेवा सुविधानी अत्याधुनिक व सुसज्ज असे हॉस्पिटल व्हावे यासाठी गेल्या १४ वर्षांपासून उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन मोर्चे , उपोषण , आमरण उपोषण करण्यात आले.एवढेच नाही तर अखेर मा. मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचीका उरण सामाजिक संस्थेच्या वतीने दाखल करण्यात आले.एवढे करूनही उरणवासीय हॉस्पिटल होईल या अपेक्षेने वाट पाहत आहेत.



त्याबाबत विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या अलिबाग येथील जनता दरबारात उरण सामाजिक संस्थेच्या वतीने काॅ. भूषण पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांनी लेखी तसेच तोंडी कैफीयत मांडली आणि केंद्र व राज्याचे अनेक अती संवेदनशील , अत्यंत ज्वालाग्राही पदार्थ हाताळणारे प्रकल्प त्याचप्रमाणे जेएनपीटी पोर्ट व त्यावर आधारित ईतर पोर्ट यातून मिळणारा प्रचंड आर्थिक नफा आणि अद्ययावत सुविधा आरोग्य / तंत्रशिक्षण शुन्य याबाबत योग्य तो पाठपुरावा करून लवकरात लवकर १०० बेड उप जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम घेण्याचे सूतोवाच केले आहे. आज हॉस्पिटलसाठी मंजूर झालेल्या सिडकोने देऊ केलेल्या प्रत्यक्ष प्लॅटवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने आणि टीमने पहाणी केली आहे. त्यामुळे उरणकरांच्या हॉस्पिटल होण्याच्या आशा पून्हा जागृत झाल्या आहेत.



पालकमंत्री उदय सामंत यांनी अलिबाग येथे दिलेल्या सुचने प्रमाणे उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष काॅ. भूषण पाटील, सचिव संतोष पवार यांनी गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावावा अशी सतत केलेली मागणी विचारात घेऊन पालकमंत्री सामंत यांच्या आदेशानुसार सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने यांना याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर पुढील प्रकिया पूर्ण करण्याचे आदेश उरण इंदिरा गांधी रूग्णालयातील अधिकारी वर्गाला दिले.



हॉस्पिलचा मंजूर भूखंडावर जिल्हा शल्य चिकित्सक स्वतः डॉ. सुहास माने, उरण इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाबासो काळेल, सहाय्यक अधिक्षक अनिल ठाकूर, नगरसेवक राजेश ठाकूर, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी आदींनी जाऊन पहाणी केली. यानंतर संबंधित अहवाल तयार करून पालकमंत्री उदय सामंत यांना पाठविला जाणार आहे. उरण वासियांना आशा आहे की उरण करांचे सुसज्ज हाॅस्पिटलचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.