niting-gadkari-mumbai-goa-highway-construction

कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 या महामार्गावरील पनवेल ते कासू, या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाडा गाव, ता. पनवेल येथे गुरुवार, दि. 30 मार्च 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता संपन्न होणार आहे.





ना. नितीन गडकरी यांच्या दौरा रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या या संभाव्य दौऱ्याची स्थानिक प्रशासनाने तयारी केली आहे. गुरुवारच्या आपल्या दौऱ्यात गडकरी महामार्ग संदर्भात नेमके काय बोलतात याकडे रायगडवासीयांचे लक्ष वेधून राहिले आहे.



या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री रविंद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य खासदार कुमार केतकर, लोकसभा सदस्य, मावळ खासदार श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, रायगड खासदार सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार जयंत पाटील, निरंजन डावखरे, श्री.अनिकेत तटकरे, श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, रविंद्र पाटील, श्रीमती आदिती तटकरे, महेंद्र थोरवे, श्री. महेश बालदी, महेंद्र दळवी यांची उपस्थिती राहणार आहे.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.