गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटणार असल्याचेही बोलले जात आहे. यावर आता शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. आम्ही शरद पवार यांच्यीशी चर्चा केली आहे. काही लोक दबावाला बळी पडू शकतात. मात्र, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल.



शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे, असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात.



तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असेही पवार म्हणाले आहेत. पवार कुटुंबियांना अशा पद्धतीच्या नोटीस आल्या आहेत. त्यांच्या घरातील कुटुंबातील घरावर धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. अजित पवार यांच्या कुटुंबावरील चौकशीचा ससेमीरा लावलेला आहे. आम्ही त्यातून भरडून निघालो. मात्र, आम्ही झुकणार नाही. शरद पवार यांनी ते सांगितलं की आम्ही झुकणार नाही की पक्ष म्हणून त्यात जाणार नाही.

महाविकास आघाडीत फूट पडणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आम्ही भेटलो, प्रदीर्घ चर्चा झाली. महाविकास आघाडी आणि आणि राज्यातील राजकारण यासंदर्भात बोललो. त्या चर्चेत हा विषय नक्कीच आलेला आहे.



By raigad

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.