maharashtra bhushan tragedy

खारघर येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास २० लाख भाविक आले होते. भर उन्हात हा कार्यक्रम पार पडला. त्यातच मुंबईत कधी नव्हे ते पारा चाळीशी पार गेला होता. याचा त्रास सोहळ्याला उपस्थित काही नागरिकांना झाला. या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताचा त्रास होऊन 11 जणांचा मृत्यू झाला.



त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. उन्हाचा त्रास होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये खारघर येथील मीनाक्षी मिस्त्री यांचाही समावेश आहे. मीनाक्षी यांच्या मुलाने भावूक प्रतिक्रिया दिली. त्या दिवशी आईने सकाळी पाच वाजताच उठून सगळ्यांसाठी जेवण तयार केलं आणि ती भर उन्हात कार्यक्रमासाठी निघून गेली



कार्यक्रम स्थळी पोहोचल्यावर तिने घरी फोन केला होता. मी जेवण तयार केलं आहे, तुम्ही जेवण करून घ्या. कार्यक्रम संपल्यावर येते.. एवढंच शेवटचं बोलणं झालं होतं. आठवण सांगताना मुलगा प्रीतिष मिस्त्री भावूक झाला होता.



मीनाक्षी यांच्याशी हे बोलणं झाल्यानंतर कार्यक्रम संपल्यावर त्या घरी येतील, असं कुटुंबियांना वाटत होतं. मात्र कार्यक्रम संपल्यानंतरही बराच वेळ झाला त्या घरी आल्या नाहीत. त्यांचा फोनदेखील लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबीय अस्वस्थ झाले. खूप वेळ शोधाशोध करूनही माहिती मिळाली नाही. अखेर संध्याकाळी ही दुर्दैवी घटना कळाली, असं प्रितिषने सांगितलं.



खारघर येथील या कार्यक्रमात नको जाऊ, असं मीनाक्षी मिस्त्री यांच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं. आम्ही आधीच रोखलं होतं. पण तिने ऐकलं नाही. ती कार्यक्रम स्थळी गेलीच, असं मुलाने सांगितलं. येथील लोकांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. व्यवस्थित नियोजन न केल्यानेच ही दुर्घटना घडली, असा आरोप मीनाक्षी यांचे कुटुंबीय करत आहेत.

राज्यभरातून आलेले लाखो श्री सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. यापैकी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. उन्हाने त्रास झालेल्यांवर नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

By raigad

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.