maharashtra bhushan news

ज्येष्ठ निरुपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल 16 एप्रिल रोजी खारघर येथे महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. नवी मुंबई परिसरात पारा चाळीशी पार गेला होता. याचा त्रास सोहळ्याला उपस्थित काही नागरिकांना झाला. या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताचा त्रास होऊन 11जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 7 ते 8 श्रीसदस्यांचा मृत्यू,  मृतांना 5 लाखांची मदत जाहीर | 7 to 8 Shrisadasas die in Maharashtra Bhushan  award ceremony, 5 lakh aid ...


उष्माघाताचा त्रास झालेल्यांना तातडीनं एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने त्यातील 11 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.



11 Die Of Heat Stroke At Maharashtra Bhushan Award Event

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (16 एप्रिल) रात्री आठच्या सुमारास पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.



शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, आम्हाला या सोहळ्यावर टीका करायची नाही. कारण आम्ही स्वत: अप्पासाहेबांना मानतो. त्यांचं मानवतेचं काम मानतो. तरी जे मृत्यू झाले ते दु:खदायक आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वेळेची सोय पाहिली गेल्याचं मला वाटतं. हा कार्यक्रम उन्ह टळल्यानंतर संध्याकाळी केला असता तर बरं झालं असतं. पण गृहमंत्री अमित शाह यांना वेळ नव्हता”.



“ ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल.”

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने यामुळे 8 महिला व तीन पुरुष असे एकूण 11 श्रीसदस्य मृत्यमुखी पडले असून 20 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

मृतांपैकी 8 मृतांची ओळख पटलेली असून उर्वरित 3 मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

1) श्रीमती वायचळ
2) तुकाराम वांगडे
3) जयश्री पाटील
4) मंजुषा भाबंडे
5) संगीता पवार
6) स्वप्नील केणे
7) महेश गायकर
8) भीमा साळवी





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.