Ved Marathi Film

महाराष्ट्राचा सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. एका दाक्षिणात्य चित्रपट मजिलीचा मराठी रिमेकने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला. या चित्रपटाने मराठी मध्ये जबरदस्त कमाई करत ७५ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तो ‘सैराट’नंतर एवढी कमाई करणारा हा दूसरा मराठी चित्रपट ठरला. ह्या १०० कोटींचा टप्पा पार केला नसला तरी या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली.



ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटर मध्ये पाहता आला नाही ते गेले कित्येक दिवस या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची वाट बघत होते, पण आता ती प्रतीक्षा संपली आहे. रितेश आणि जिनिलीयाचा ‘वेड’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे आणि प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येणार आहे.



अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘वेड’च्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल खुलासा केला आहे. चित्रपटगृहापाठोपाठ आता ‘वेड’ ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. येत्या २८ एप्रिल पासून ‘वेड’ हा चित्रपट Disney + Hotstar ‘डिज्नी +हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे, इतकंच नव्हे तर हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये पाहता येणार असल्याने इतर भाषिक प्रेक्षकांनासुद्धा याचा आनंद घेता येणार आहे असेही त्याने या वेळी नमूद केले आहे त्यामुळे आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे आणि लवकर हा धमाकेदार चित्रपट आपल्याला ओटीटी वर पाहायला मिळणार.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.