appasaheb dharmadhikari maharashtra bhushan

नवी मुंबई खारघरच्या कॉर्पोरेट पार्क मैदानात थोर समाजसुधारक ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना रविवार दि. १६ एप्रिल, २०२३  रोजी आयोजित कार्यक्रमात आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, सर्वांनी झोकून देऊन काम करून, इतिहासात नोंद घेतली जाईल असा ‘न भूतो न भविष्यती’ असा हा कार्यक्रम पार पाडूया, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.



ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारावेळी खारघरमधील कार्यक्रमासाठी येणाऱ्या सदस्यांची गैरसोय होणार नाही. यासाठी श्री सदस्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे.



आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आतापर्यंत बऱ्याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2014 साली त्यांना डॉक्टरेट म्हणजेच मानद पदवी देण्यात आली. 2017 मधे पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले तर यंदाच्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर केले.



महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे. शासनाची आणि प्रशासनाची ही सर्वस्वी जबाबदारी आहे, त्यांना ‘श्री’ सदस्य सहकार्य करण्यासाठी सज्ज आहेत. कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे हजारो वाहने याठिकाणी येणार असून वाहनतळाचीही योग्य ती व्यवस्था करावी, पोलिसांबरोबर वाहतूक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे, अंदाजे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.



कार्यक्रमस्थळी 10 कार्डीऍक अॅबूलसन्स, 50 अॅबूलसन्स, 350 डॉक्टर असणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी बेस्टच्या 500 बसेस, ठाणे मधून 200 बसेस सोडण्यात येणार असून खारघर रेल्वे स्टेशनपासून कार्यक्रम स्थळापर्यंत बसेसच नियोजन करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमाची जबाबदारी मंत्री उदय समंत, मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.



पूर्वतयारी आढावा बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री भरत गोगावले, प्रशांत ठाकूर महेश बालदी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचेसह रायगड, ठाण्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, ठाणे, पनवेल, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.