NCP Anil Patil Resign

शरद पवार यांच्या निर्णयानंतर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या नेत्यानी राजीनामा (Resign) देण्यास सुरवात केली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागेल आहेत.

शरद पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग आला आहे. अनिल पाटील यांनी शरद पवार यांना राजीनामा पत्र पाठवलं. ‘पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. असा सवाल उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलेलं आहे. तर आता राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील (Anil Patil) यांनी सुद्धा आमदार पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पवारांना पाठवले. राष्ट्रवादी पक्षातून हा एक मोठा राजीनामा असल्याचे समजते.

शरद पवार यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. किमान २०२४ च्या निवडणुका होईपर्यंत तरी राजीनामा देवू नका, अशी विनंती शरद पवार यांना केली आहे,’ असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

आपण घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पाटील यांनी केली आहे. माझ्यासह पक्षातील इतर आमदार देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असे अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.

By raigad

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.