mumbai best bus new rule

सध्या प्रत्येकजण मोबाईल वापरतो. बस किंवा ट्रेन, लोकलमध्ये प्रवास करताना आपण अनेकदा मोबाईलमध्ये व्यस्त असतो. वेळ घालवण्यासाठी रिल्स पाहणे, तसेच बस, ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात, मोठ-मोठ्याने मोबाईल कॉलवरती बोलत असतात.



अशा लोकांसाठी मोबाईल वापराबाबत एक नवा नियम आला आहे, ज्यामध्ये तुम्ही बसमध्ये प्रवासादरम्यान फोनवर मोठ्याने बोलल्यास किंवा हेडफोनशिवाय व्हिडिओ/ गाणी पाहिल्यास/ ऐकल्यास तुम्हाला 5000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. किंवा 3 महिन्यांची शिक्षादेखील होऊ शकते



सध्या हा नियम बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने म्हणजेच बेस्टने लागू केला आहे. या नियमांतर्गत बसमध्ये हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहण्यावर बंदी घालण्यात आली असून, नियम मोडल्यास तुरुंगवासही होण्याची शक्यता आहे.



बेस्टने या आठवड्यापासून मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहण्यास किंवा गाणी वाजविण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना 25 एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. नव्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी बसेसमध्ये सूचना चिकटविण्याचे काम सुरू झाले आहे. हा नवा नियम मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील बस प्रवाशांना लागू होणार आहे.

बस प्रवाशांच्या गैरसोयीपासून वाचण्यासाठी तसेच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी हा नवा नियम आणण्यात आला आहे. नव्या परिपत्रकानुसार आवाजाची डेसिबल पातळी कमी ठेवण्यासाठी नवा नियम आणण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही बस प्रवाशाला फोनवर मोठ्याने बोलू दिले जाणार नाही. तुम्हाला संगीत ऐकायचे असल्यास, विडिओ किंवा रिल्स पाहायचे असल्यास आपल्या सोबत हेडफोन ठेवणे गरजेचे आहे.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.