Mahad Snehal Jagtap uddhav thackray

शिवसेनेमधून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हळूहळू पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्याचपैकी असलेल्या महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला. त्यांची महाडमध्ये जाहीर शिवगर्जना सभा झाली. पण सभेत चर्चा झाली ती स्नेहल माणिकराव जगताप यांची!



स्नेहल जगताप कोण आहेत ?

महाडचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या स्नेहल जगताप या कन्या आहेत. माणिकराव जगताप यांच्या विचारांचा मोठा मतदार रायगडमध्ये विशेषतः महाड मतदारसंघात आहे.

विद्यार्थी काँग्रेसमधून माणिकराव जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते.

घरातून राजकीय वारसा लाभला असल्याने स्नेहल जगताप यांचा पक्ष प्रवेश ठाकरेंसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार सांगतात. याआधी स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे



महाडच्या नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या महाडच्या चांदे क्रीडांगणावरील सभेदरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी त्यांच्यावर ठाकरे गटाकडून एक महत्वाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे.

आमदार गोगावले यांना टक्कर देऊ शकेल, असा चेहरा उद्धव ठाकरेंकडे नव्हता. त्यामुळे आता स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना भारत गोगावले यांच्या विरोधात एक मजबूत नेता सापडला आहे.

महाड विधानसभा हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आणि गेल्या १५ वर्षांपासून आमदार असलेले भरतशेठ गोगावले यांनी शिंदेंना साथ दिल्यानंतर या ठिकाणी ठाकरे गटासाठी मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यामुळे शिवसेनेचाशिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या महाड मतदारसंघात शिवसेनेच्या अस्तित्वाला मोठं भगदाड पडलं.

स्नेहल जगताप यांचा कुटुंबियांसह ठाकरे गटात प्रवेश; मिळाली महत्वाची जबाबदारी



यावेळी स्नेहल जगताप, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व त्यांचे काका हनुमान जगताप यांच्या महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकारींनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते अनंत गिते यांनी स्नेहल जगताप यांचा परिचय करुन देताना त्यांचा पक्ष प्रवेश झाल्याचं जाहीर केलं. तसेच महाडचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याचंही यावेळी गिते यांनी सांगितलं.

काँग्रेसने आम्हाला नेहमीच मान सन्मान दिला आहे, याबाबत आपली कोणतीही तक्रार वा नाराजी नाही.

– स्नेहल जगताप

स्नेहल जगताप बोलताना म्हणाल्या, “माझ्या कुटुंबियांसह आणि हितचिंतकांसह आम्ही ठाकरे गटात प्रवेश करत आहोत. आज या सभेच्या निमित्तानं सांगते की या मतदारसंघात केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल. या मतदारसंघातील जनतेनं आता ठरवलं आहे. या शहरानं मला नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. निवडणुकांदरम्यान दिलेल्या आश्वासानानुसार मी ९० टक्के कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे”



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.